18 जुलैला खात्यात थेट ₹6000! PM Kisan व Namo Shetkari योजनेची यादी जाहीर – लगेच तपासा

शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की “पीएम किसान सन्मान निधी” आणि “नमो शेतकरी योजना” या दोन्ही योजनांचे पैसे आता एकाच वेळी मिळणार आहेत. म्हणजेच तुमच्या खात्यात एकदाच ₹4000 रुपये जमा होणार आहेत.

पण हे पैसे मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे KYC – म्हणजे तुमचं नाव, आधार आणि बँक खातं एकमेकांशी जोडलेलं असणं गरजेचं आहे. जर KYC पूर्ण नसेल, तर पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ज्यांचं KYC अजून बाकी आहे, त्यांनी जवळच्या CSC केंद्रात जाऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावं.

सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि पेरणी चालू आहे. याच काळात बी-बियाणं, खतं, औषधं यासाठी पैसे लागतात. म्हणूनच सरकारने हे पैसे १८ जुलैच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवायचं ठरवलं आहे. जवळपास ९३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळेल.

पण लक्षात ठेवा, हे पैसे फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत, ज्यांची सर्व कागदपत्रं बरोबर आहेत – जसं की आधार, बँक खाती आणि KYC नीट जोडलेलं आहे. काही शेतकऱ्यांना मागच्या वेळचे पैसे मिळाले नव्हते, त्यांची पण सरकारने नोंद घेतली आहे. आता त्यांच्या खात्यातही मागचे पैसे दिले जातील. गावोगावी कर्मचारी जाऊन कागदपत्रं तपासत आहेत आणि चुका सुधारत आहेत.

पीएम किसान योजना म्हणजे काय? ही केंद्र सरकारची योजना आहे. यात शेतकऱ्यांना वर्षाला तीन वेळा ₹2000 असे एकूण ₹6000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

म्हणून मित्रांनो, जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी असाल आणि तुमचं KYC पूर्ण असेल, तर लवकरच तुमच्या खात्यात ₹4000 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे शेतीसाठी खूप उपयोगी पडतील. म्हणून खातं तपासा आणि अजून KYC बाकी असेल, तर आजच पूर्ण करा.

Leave a Comment