नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याबद्दल शेतकरी मित्रांनो मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक महिन्यांपासून ज्यांना हप्त्याची वाट पाहावी लागत होती, त्यांना आता पैसे मिळणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन बैठक घेऊन हा निर्णय केला. पेरणी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना लगेच पैसे मिळणे गरजेचे होते, म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ४ हजार रुपये मिळणार आहेत. त्यात पीएम किसान योजनेतून २ हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून २ हजार रुपये असतील. पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा ७वा हप्ता एकत्र जमा होणार आहे. तांत्रिक कारणामुळे हे पैसे दोन टप्प्यांत दिले जातील. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांना पैसे मिळतील, उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात हप्ता दिला जाईल. शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा SMS देखील येईल.
पहिल्या टप्प्यात नांदेड, संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सर्वांना पैसे मिळणार नाहीत. काही अटी आहेत. eKYC करणे आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे. जर हे पूर्ण केले नसेल तर पैसे मिळणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात कोणी पोलीस, सैन्य किंवा सरकारी नोकरीत असेल, त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे किंवा १० एकरांपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांनाही पैसे मिळणार नाहीत.
खाते कोणत्या बँकेत आहे हेही महत्त्वाचे आहे. शासनाने निवडक बँकांची यादी केली आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, HDFC, ICICI, महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट ऑफिस यांचा समावेश आहे. जर खाते यापैकी एखाद्या बँकेत असेल तरच पैसे मिळतील.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो, म्हणून सरकारने वेळेवर मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. चार महिन्यांपासून पैसे येत नव्हते, त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.